बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (16:22 IST)

व्हॉटसअॅपचे नवे फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला ते समजणार

व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केलं आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव आहे. या फीचरच्या माध्यमातून एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे हे समजू शकणार आहे. अशा मेसेजवर एक डबल अॅरोवाल एक आयकॉन येईल.
 
भारतात मोठ्या प्रमाणात फेकन्यूज व्हायरल केल्या जातात. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तर याचे प्रमाण आणखी वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून व्हॉटसअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणली. जर एखाद्या मेसेजला 5 पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड केल्यास त्यावर लेबल दिसेल. व्हॉटसअॅपच्या मते एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे, याची माहिती एण्ड-टू-एण्ड एनक्रिप्ट राहील याचा अर्थ ही माहिती इतर कुणी पाहू शकणार नाही.
 
गेल्यावर्षी व्हॉटसअॅपने forwarded लेबल लाँच केलं होतं. हे फीचर जगभरात वापरलं जातं. व्हॉटसअॅपवरही फॉरवर्डेड मेसेजवर forwarded असं लिहिलेलं येते. कंपनीच्या या निर्णयांमुळे फेक न्यूजवर बऱ्यापैकी रोख लागलेला दिसत आहे.