मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:41 IST)

मुंबईत जोरदार पाऊस, दुपारी मोठी भरती येणार

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात सकाळी पाणी साचलेलं दिसतंय. आज आणि उद्या कोकण किनारपट्टीस मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. समुद्रालाही आज दुपारी मोठी भरती येणार असल्यानं नागरिकांना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.
 
मुंबईतील विविध भागात रात्रभर पाऊस सुरु आहे. वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय. अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलीय. रात्रभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही सखल पाणी साचलंय. दहिसर पूर्व इथल्या काही इमारतीमध्ये पाणी भरलंय. तर लोकल रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम दिसून येतोय. जवळपास २०-२५ मिनिटे उशिरानं वाहतूक सुरू आहे.