देशातील पहिली महिला सैन्य भरती बेळगावात
3 हजार तरुणींचा उस्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : देशातील पहिल्या महिला सैन्य भरतीला बेळगावात सुरुवात झाली आहे. 1 ते 5 ऑगस्टरदम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार असून तरुणींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तर देशात केवळ पाच ठिकाणीच ही भरती होणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, अंदमान निकोबार येथील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जवळपास तीन हजार उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीमध्ये धावणे, लांब उडी आणि उंच उडीचा समावेश आहे. पाऊस पडत असतानाही तरुणींचा उत्साह कायम होता. यावेळी अनेक महिला उमेदवारांना चक्कर आली. तिथे उपस्थित महिला पोलीस आणि जवानांनी तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांची नंतर वैद्यकीय तपासणी होईल. आणि त्यानंतर लेखी परिक्षेला सामोरं जावं लागेल. देशात एकूण ठिकाणी ही भरती प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.