गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2017 (21:14 IST)

आता एका दिवसात मिळणार पॅन आणि टॅन कार्ड

pancard

आता एका दिवसात पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सीबीडीटीने एका दिवसात पॅन आणि कर कपात खाते क्रमांक (टॅन) उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयासोबत करार केला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. अर्जदार कंपन्या याचा लाभ घेण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयाच्या संकेतस्थळावरुन एसपीआयसीई हा संयुक्त अर्जाचा फॉर्म भरतील. त्यानंतर मंत्रालयाकडून केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाकडे कंपनीच्या स्थापनेविषयी सर्व माहिती पोहोचली की अर्जदाराला सहजपणे पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध होईल. मार्च महिन्यात 10,894 कंपन्यांनी पॅनसाठी अर्ज केला. त्यापैकी 95.63 टक्के प्रकरणांमध्ये कंपन्यांना चार तासांच्या आत पॅन क्रमांक मिळाला तर 94.7 टक्के प्रकरणांमध्ये टॅन क्रमांक उपलब्ध झाला.