शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (09:08 IST)

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या 5 जीच्या प्रदर्शनात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जी च्या तुलनेत 5 जीचा डाउनलोड स्पीड किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते.

देशात 5 जीमुळे दैनंदिन जीवनात कोणते बदल होतील, याचं प्रेझेंटेशन  मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झालं.  नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केलं. शहरी आणि ग्रामीण वाहतुकीच्या समस्येवर 5 जी हे चांगलं सोल्युशन असू शकेल, असा विश्वास नोकियाचे भारतातले विपणन प्रमुख अमितकुमार मारवा यांनी यांनी व्यक्त केला आहे.