मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (12:49 IST)

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ना?

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी देताना म्हटलं की नवीन अॅप इंस्टॉल करताना काळजी घ्या. RBI नुसार Play Store आणि App Store मध्ये उपलब्ध अॅनीडेस्कसारखे बरेच अॅप्स यूपीआय आणि मोबाइल वॉलेटमधून काही सेकंदातच आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात. आरबीआय प्रमाणे हा अॅप डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्याचे त्याच्या डिव्हाइसवर कोणतेही नियंत्रण राहून जात नाही. सायबर गुन्हेगार याच्याद्वारे जगातील कोणत्याही भागातून डिव्हाइसला रिमोटली ऍक्सेस करून बँक खाते रिकामे करू शकतात. UPI (युनिफाइड पेमेंट्स सिस्टम) द्वारे वाढत असलेली फसवणूक बघताना RBI ने या दिशेने लोकांना जागरूक करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि ही चेतावणी जारी केली आहे.
 
* अशी होऊ शकते फसवणूक - एकदा डाउनलोड केल्यानंतर अॅनीडेस्क वापरकर्त्याच्या डिव्हाईसवर 9-अंकी अॅप कोड जनरेट करतो आणि सायबर गुन्हेगार कॉल करून बँकेच्या नावावर वापरकर्त्याकडून तो कोड मागतात. एकदा हा कोड प्राप्त झाल्यानंतर हॅकर वापरकर्त्याच्या डिव्हाईसवर हल्ला करतो आणि त्याला माहीत न पडता त्याच्या डिव्हाईसची सर्व माहिती डाउनलोड करू शकतो आणि त्याच्यातर्फे व्यवहार करू शकतो.