मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

28 फेब्रुवारीनंतर Paytm, Payzapp आणि Phonepe अकाउंट होतील बंद

आपले मोबाइल वॉलेट खाते 1 मार्चपासून बंद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या नियमांनुसार देशातील 80% मोबाइल वॉलेट बंद होतील. 
 
* 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे - 
देशभरात कार्यरत सर्व मोबाइल कंपन्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्या ग्राहकांची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी केवायसी पूर्ण केलेले नाही. अशा परिस्थितीत, मोबाईल वॉलेट बंद करण्याचे धोके पत्करावे लागतील.
 
* राहत - 
भारतीय रिझर्व्ह बँकने मोबाइल वॉलेट वापरकर्त्यांना मोठी सवलत देत म्हटले की 28 फेब्रुवारी नंतर देखील त्यांच्या वॉलेट मधील शिल्लक संपणार नाही. यासह वॉलेटमध्ये असलेल्या पैशांनी आपण खरेदी करण्यास सक्षम असाल. आपण आपल्या बँक खात्यात देखील पैसे पाठवू शकता.
 
* केवायसीशिवाय वॉलेटमध्ये पैसे लोड नाही होणार - 
आरबीआयने असे म्हटले आहे की ग्राहक 1 मार्चपासून केवायसीशिवाय वॉलेटमध्ये पैसे ठेवू शकणार नाही. यासह कोणालाही पैसे देखील पाठवू शकणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांमुळे हे होणार आहे. आरबीआयने सर्व मोबाइल वॉलेट कंपन्यांकडे निर्देश दिले आहे की त्यांनी त्यांच्या वापरकर्त्यांची मूलभूत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.
 
* केवायसी अनिवार्य - 
काही मोबाइल वॉलेट कंपन्या जरी ग्राहकांमध्ये ही अफवा पसरवत होत्या की 1 मार्च नंतरही त्यांची सेवा केवायसी नसतानाही ग्राहकांसाठी सहजतेने चालणे सुरू राहील तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी करणे अनिवार्य आहे.
 
* या कंपन्यांवर होईल परिणाम - 
आरबीआयने देशात सर्व परवानाकृत मोबाइल वॉलेट कंपन्यांना आपल्या ग्राहकांच्या केवायसी नियमांची पूर्तता करण्यासाठी फेब्रुवारी 2018 पर्यंतची वेळ दिली होती. अनेक कंपन्याने आरबीआयचा हा नियम पाळला नाही. तरी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास देशभरातील बर्‍याच कंपन्यांचे मोबाइल वॉलेट बंद केले जातील.
 
* हे देशभरातील प्रमुख मोबाइल वॉलेट कंपन्या आहे - 
पेटीएम, मोबीक्विक, एसबीआय योनो, एचडीएफसी पैजेप, एम-पैसा, एअरटेल मनी, चिल्लर, ऍमेझॉन पे, फोन पे यासह देशातील मोठ्या मोबाइल वॉलेट कंपन्या आहे.
 
* पेटीएम अॅपवर असे करा बेसिक केवायसी - 
पेटीएम अॅप वर जा आणि केवायसी चिन्हावर क्लिक करा.
यानंतर, आपला आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा. हे केल्यानंतर कंपनी कडून प्रतिनिधींना पाठवण्यासाठी आपले नाव, घर किंवा कार्यालयीन पत्ता आणि पिन कोड विचारले जाईल. 
त्यानंतर, पुढील 2 ते 4 दिवसांत आपल्यास दिलेल्या पत्त्यावर येणार्‍या दस्तऐवजांची पडताळणी कंपनी प्रतिनिधी करेल. 
पेटीएम हे एकमेव असा मोबाइल वॉलेट आहे, ज्यामध्ये कंपनी प्रतिनिधी आपल्या घरी किंवा कार्यालयात येऊन केवायसीची औपचारिकता पूर्ण करतो. 
आपण कंपनीच्या केवायसी सेंटरमध्ये जाऊन देखील औपचारिकता पूर्ण करू शकता. पण यापूर्वी आपल्याला पेटीएम अॅपवर जाऊन, मूलभूत केवायसी आधारावर पूर्ण करणे आवश्यक आहे.