मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

शाओमीची सेल 19 डिसेंबर पासून, या उत्पादनांवर सवलत मिळेल

2018 च्या समाप्तीपूर्वी शाओमी आपल्या फॅन्ससाठी अजून एक सेल आयोजित करणार आहे. शाओमीची "न.1 एमआय फॅन सेल" 19 डिसेंबरपासून सुरू होणार आणि 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Xiaomi Redmi Y2, Mi A2 आणि Redmi Note 5 Pro सह बरेच शाओमी स्मार्टफोन स्वस्तपणे विकले जातील. या व्यतिरिक्त, शाओमीचे दूरदर्शन आणि उपकरणे देखील एमआय फॅन सेल दरम्यान सूटवर उपलब्ध असतील. या सेलसाठी Xiaomi ने Google, MobiKwik आणि Paytm सह भागीदारी केली आहे.
 
 Xiaomi No.1 Mi Fan Sale मध्ये Redmi Y2 ची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये असेल. उल्लेखनीय आहे की हे हँडसेट 9,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीवर लॉन्च करण्यात आले होते.  Xiaomi Mi A2 हा कंपनीचा नवीनतम अँड्रॉइड वन स्मार्टफोन आहे. हा 1000 रुपये सूटवर 14,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीवर उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त Redmi Note 5 Pro हँडसेट शाओमीच्या या सेलमध्ये 12,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीवर उपलब्ध होईल. शाओमीने Redmi Y2, Redmi Note 6 Pro, Mi A2, Poco F1, Redmi 6, Redmi 6A, Redmi 6 Pro आणि Redmi Note 5 Pro साठी शाओमीने पेटीएमसह भागीदारी केली आहे. या हँडसेट्स बरोबर 300 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
 
शाओमी स्मार्टफोन व्यतिरिक्त No.1 Mi Fan Sale मध्ये अनेक एमआय टीव्ही मॉडेल देखील स्वस्तात उपलब्ध असतील. Mi TV 4A Pro 49 टीव्ही सेट 30,999 रुपयात उपलब्ध होईल, जेव्हाकी Mi TV 4C Pro 32 टीव्ही सेट 14,999 रुपयात मिळेल. Mi TV 4A 43 सेलमध्ये 21,999 रुपयात विकला जाईल. 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये Mi Body Composition Scale ची किंमत 1,799 रुपये असणार. या स्केलला मार्चमध्ये 1,999 रुपये किमतीवर लॉन्च केले होते. ख्रिसमसला पाहताना शाओमीने आपल्या Poco F1, Redmi Note 6 Pro आणि Redmi Note 5 Pro देखील लाल रंगात उपलब्ध करेल.