बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:43 IST)

आता व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाहता येणार

व्हॉट्स अॅपवर विविध व्हिडीओच्या लिंक्स पाहण्यासाठी दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत असे. मात्र, आता व्हॉट्स अॅपने यावर तोडगा काढला आहे. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाहता येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture-in-Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे. 
 
सध्या हे फिचर फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच उपलबद्ध आहे. व्हॉट्स अॅप अँड्रॉइडच्या नव्या अपडेटमध्ये (Version 2.18.280) ही सुविधा वापरता येईल. आयफोन आणि टॅबसाठी लवकरच उपलबद्ध होईल अशी शक्यता आहे. सध्या हे फिचर बेटा मोडसाठी उपलबद्ध आहे. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या बाहेरच्या साइट्सवरील लिंक्स असलेले व्हिडिओ व्हॉट्स अॅपमध्येच पाहता येतील.