गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरू झाली.
 
जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्व्हिसेसच्या किमती कमी केल्या. किमतीवरून सुरू झालेलं युद्ध अजूनही थांबताना दिसत नाही. याचा फायदा ग्राहकांना होत आहे. टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांच्या मते, मार्चनंतरही जिओ फ्री ऑफर कायम ठेवू शकते.
 
रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या आर्थिकबाबतीत मजबूत स्थितीत आहे. जिओ यामुळे अधिक वेळ या प्राईस वॉरमध्ये राहू शकतो. रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.