रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त प्लान,75 ,91,125 रुपयांमध्ये अमर्यादित कॉल, डेटा आणि वैधता
रिलायन्स जिओने त्यांच्या जिओ फोन ग्राहकांसाठी परवडणारे प्लान आणले हे. जिओ आपल्या 4G ग्राहकांसाठी कमी किमतीचा अमर्यादित व्हॉइस कॉल ऑफर करत आहे. हे 3 प्लान आहे 75 रुपयांचे ,91 रुपयांचे आणि 125 रुपयांचे .
1 75 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लान -
75रुपयांच्या प्रीपेड पॅक ची वैधता 23 दिवसांची असून 100 एमबी डेटा आणि 200 एमबी डेटा देखील उपलब्ध आहे. युजर्स या प्लान मध्ये एकूण 2.5 डेटा वापरू शकतात. तसेच अमर्यादित व्हॉइस कालचा लाभ घेऊ शकतात या प्लान मध्ये 50 एसएमएस देण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या इतर प्लॅन्सप्रमाणे, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचा अॅक्सेस देखील ग्राहकांना मोफत दिला जातो.
2 91रुपयांचा रिलायन्स जिओ प्लान -
या प्लान ची वैधता 28 दिवसांची असून 100 एमबी सह 200 एमबी अतिरिक्त डेटा मिळतो युजर्स एकूण3Gb डेटा चा लाभ घेऊ शकतात. रिलायन्स जिओ या प्लॅनमध्ये आपल्या जिओ फोन वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 50 एसएमएस ऑफर करते. याशिवाय, जिओच्या या प्लॅनमध्ये, या प्रीपेड पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सवर प्रवेश देखील विनामूल्य उपलब्ध आहे.
3 125 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लान-
रिलायन्स जिओने हा रिचार्ज प्लान खासकरून जिओ फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. जिओच्या या प्लानची वैधता 23 दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज 0.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण 11.5 जीबी डेटा वापरू शकतात.
Jio फोनसाठी उपलब्ध असलेल्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील देण्यात आले आहेत. या पॅकमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
Edited By- Priya Dixit