1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. reliance jio start DTH service

जिओचा आणखी एक धमाका, DTH सर्विस सुरू करणार

रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करत कंपनी आता  DTH सर्विस सुरू करणार आहे. या महिन्यातच सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याचे समजते.  
 
सोबतच सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 90 दिवस सर्विस फ्री देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना सर्विस आवडल्यानंतरच त्यांच्याकडून पैसे आकारले जातील असं म्हटलं जात आहे. जिओ आपल्या  DTH सर्विससाठी महिन्याला 180 ते 200 रूपये आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 HD चॅनलसह 300 चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे.  
पुढील लेख
आयपीएल 10 - रॉयल चँलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय