बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (11:47 IST)

ट्रू-कॉलरवरुन नाव काढायचेय?

ट्रू कॉलरच्या मदतीने यूजरला कॉलर आयडीचा शोध लागतो. आपण त्याचा वापर करत असाल तर त्याच्या कार्यप्रणालीची प्राथमिक माहिती ठाऊक असेलच. एवढेच नाही तर हे एप आपल्या नंबरवरून आपले सर्व विवरण देण्याचे काम करते. या डिटेल्समध्ये कॉलरचे नाव, लोकेशन, प्रोफेशन याची माहिती मिळते. ज्या यूजरच्या मोबाइलमध्ये हे एप इन्स्टॉल आहे आणि नोंदणी केली असेल तर संबंधिताची माहिती ट्रू कॉलरवर मिळते. जर आपल्याला ट्रू कॉलरवरून नाव, नंबर काढून टाकायचे असेल तर पुढील प्रक्रिया करावी.
अँड्राइड
एप सुरू करा. नंतर उजवीकडे पीपल्स आयकॉनला टॅप करा. नंतर सेटिंग्ज+अबाउट+डीअक्टिव्हेट अकाउंट.
आयफोन
एप सुरू करा. उजवीकडे वर गिअर आयकॉनवर टॅप करा. नंतर अबाउट ट्रूकॉलर+खाली जा+नंतर ट्रूकॉलरला डीअक्टिव्हेट करा.
विंडोज मोबाइल
एप सुरू करा. नंतर खालील भागात उजवीकडे तीन डॉटला क्लिक करा. नंतर सेटिंग्ज+हेल्प+अकाउंट डीअक्टिव्हेट करा.
नंबर असा काढून टाका
जर आपला नंबर ट्रू कॉलरच्या डेटाबेसमधून काढायचा असेल तर लक्षात ठेवा जर एपची सेवा घेत असाल तर नंबर काढून टाकू शकत नाही. त्यामुळे नंबर काढण्यासाठी आपल्याला खाते बंद करावे लागेल. जर आपला नंबर काढून केवळ दुसर्यामची माहिती गोळा करायचा विचार असेल तर ते शक्य नाही. अर्थात ट्रू कॉलरवरून आपला नंबर काढण्याची पद्धत सोपी आहे. सर्वात अगोदर ट्रू कॉलरच्या अनलिस्ट पेजवर जा. तेथे कंट्री कोडसह आपला नंबर टाका. अनलिस्ट करण्यासाठी पर्यायाची निवड करुन कारण सांगा. आपण कोणतेही कारण सांगू शकता. त्यानंतर व्हेरिफिकेशन कॅपचा टाका. अनलिस्टवर क्लिक करा. अनलिस्ट रिक्वेस्ट मिळाल्यानंतर चोवीस तासात आपला नंबर डिलिट होतो.
महेश कोळी