शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:31 IST)

सुमारे सहा हजार कंपन्या डेटा हॅक

देशभरातील आधार पोर्टल, इस्त्रो, टेलिकॅम्युनिकेशन कंपन्या, वित्तीय संस्था, ई-कॉमर्स वेबसाईटसह जवळपास सहा हजार कंपन्या आणि शासकीय व निमशासकीय संस्थांचा अतिसंवेदनशील डेटा हॅकर्सनी चोरला आहे. विशेष म्हणजे या हॅकर्सनी या डेटासाठी जवळपास १५ बिटकॉन अर्थात भारतीय चलनातील ४२ लाख रुपयांपासून ऑनलाईन बोली पुकारली आहे. हॅकर्सने पुकारलेल्या लिलावाबद्दलची ही माहिती सिक्युराईट या कंपनीने जाहीर केल्यानंतर सायबर क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सायबरकडूनही या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून याबाबतची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.