गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (13:56 IST)

जिओ चा 1 रुपयात 30 दिवसांची वैधता सह 100 MB डेटासह सर्वात स्वस्त प्लान

The cheapest plan of Geo with 100 MB data with 30 days validity at Rs 1  जिओ चा 1 रुपयात 30 दिवसांची वैधता सह 100 MB डेटासह सर्वात स्वस्त प्लानMarathi IT Marathi IT News  In Webdunia Marathi
जिओ ने 1 रुपयाचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 100MB डेटा मिळेल. हा प्लॅन जिओच्या मोबाईल अॅपवर दिसत आहे. हे पॅक व्हॅल्यू विभागात इतर योजनांच्या अंतर्गत सूचीबद्ध आहे.
10 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळणार आहे , या प्लान मध्ये युजर्स ला1GB डेटा फक्त 10 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच, जर 1 रुपयांच्या प्लान मध्ये 10 वेळा रिचार्ज केले तर युजर्सला 1GB डेटा मिळेल. सध्या 1GB डेटासाठी 15 रुपयांचा प्लान घ्यावा लागत होता. पण आता 1 रुपयांच्या नवीन प्लान मध्ये 5 रुपये वाचवू शकता.
काही दिवसांपूर्वी, जिओ ने आपल्या सर्वात बेसिक डेली डेटा प्रीपेड प्लान मध्ये सुधारणा केली आहे, ज्याची किंमत 119 रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह युजरला दररोज 1.5GB डेटा दिला जात आहे. या प्लान मध्ये 14 दिवसांची वैधता मिळते. इतर फायदे म्हणून जिओ अॅप्सचा मोफत एक्सेस देखील देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 300 एसएमएसही देण्यात आले आहे.