मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही

अनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. कारण बऱ्याच आयफोनचा व्हॉट्स अॅप सपोर्ट बंद होणार आहे. याचं कारण आहे, व्हॉट्सअॅपचं 2.18.90 हे नवं अपडेट. या अपडेटनंतर व्हॉट्स अॅप अनेक जुन्या आयफोनवर काम करणार नाही. 
 
सर्व जुने आयफोन जे आयओएस 7 वर कार्यरत आहेत, त्यांचा 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत सपोर्ट बंद करावा अशी व्हॉट्स अॅपची योजना आहे. याचा अर्थ जे लोक आयफोन 4 चा वापर करत आहेत, त्यांना नवा फोन घ्यावा लागेल. मात्र, जे आयओएस 7 असलेला आयफोन वापरतात ते 2020 पर्यंत व्हॉट्सअॅपचा पूर्वीप्रमाणेच वापर करु शकतात. पण, जर त्यांनी व्हॉट्स अॅप डिलीट करुन पुन्हा इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना व्हॉट्स अॅपला मुकावं लागणार आहे. कारण त्यांनी एकदा व्हॉट्सअॅप डिलीट केल्यास पुन्हा इन्स्टॉल करता येणार नाही. याशिवाय जुना आयफोन वापरणाऱ्यांना नवे अपडेट किंवा नवे फिचरही मिळणार नाहीत, इतकंच नाही तर आता जे फिचर आहेत त्यापैकी काही फिचरचा वापरही त्यांना करता येणार नाही.