शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (10:45 IST)

भारतात आता टिक टॉक चे नवीन रूप एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

चीनी कंपनीची मालकी असलेले आणि विपरीत परिणाम होतात म्हणून कोर्टाने बंद करायला लावलेले टिक टॉक चे नवीन रूप घेवून येणार आहे. टिक टॉक कंपनी भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून, बाईट डान्स चीनमधील एक स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीचे हे टिक टॉक अॅप आहे. 
 
याआगोदर कंपनीने भारतात काही अॅपसाठी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीय. यामध्ये विगो, हेलो व टिक टॉकचा समावेश होता. मात्र आता टिक टॉक बंद झाल्याने मे महिन्यात बाईट डान्स आपल्या देशात एक नवीन अॅप दाखल करणार आहे. कंपनी काही महिन्यांपासून कॉन्टेन्ट मॉडरेशन पॉलिसीवर जोरदार काम करत आहे. देशात टिक टॉकवर बंदी केल्यामुळे वाईट वाटलं असून, आम्हाला अपेक्षा आहे यावर आम्ही मार्ग नक्की शोधू. भारतीय यूजर्सला आम्ही हे वचन देतो. कंपनीकडून येणाऱ्या तीन वर्षात एक वेगळं अॅप लाँच करु, असं बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर यांनी स्पष्ट केले आहे. नवीन अॅप टिक टॉकसारखा असेल की वेगळ्या प्रकारात असेल याबद्दल कंपनीने अजूनतरी गुप्तता ठेवली आहे. यावर्षाच्या शेवटी कंपनी कर्मचारी देखील वाढवणार आहे.