गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (13:35 IST)

TVS ची नवी स्पेशल बाईक आली, फक्त 200 लोक ती विकत घेऊ शकतील

TVS मोटार कंपनीने आपली नवीन रेस परफॉर्मन्स सिरीज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. TVS Apache मोटारसायकलच्या मालिकेत नवीन रेस परफॉर्मन्स मालिका सादर करण्यात आली आहे. नवीन TVS Apache RTR 165 RP हे रेस परफॉर्मन्स मालिकेतील पहिले प्रॉडक्ट  आहे. या विशिष्ट बाइकचे फक्त 200 युनिट्स येतील. म्हणजेच फार कमी लोक ही बाईक खरेदी करू शकतील. 
TVS Apache RTR 165 RP मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. हे नवीन मॉडेल TVS Apache RTR 160 4V बाइकवर आधारित आहे. RP एडिशन 164.9cc सिंगल-सिलेंडर, चार-वाल्व्ह इंजिन पावर्ड आहे जे 10,000rpm वर 18.9bhp आणि 8,750rpm वर 14.2Nm पीक टॉर्क जनरेट करते. 
TVS अपाचे RTR 165 RP बाईक रेस-ट्यून्ड स्लिपर क्लच, अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर्ससह येते. बाइकला ऑल-न्यू रेसिंग डीकैल्स, रेड-अलॉय व्हीलस  आणि नवीन सीट पॅटर्न दिले आहेत. TVS Apache RTR 165 RP अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह नवीनतम तंत्रज्ञानासह येते. उत्कृष्ट ब्रेकिंग परफॉर्मन्स देण्यासाठी, या मॉडेलला फर्स्ट -इन-सेगमेंट 240mm रीअर डिस्क ब्रेक दिले आहेत.