बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (17:19 IST)

Apple Days Sale: Amazon वर iPhones वर 23 हजार रुपयांपर्यंत सवलत

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने सोमवारी Apple Days Sale ची घोषणा केली आहे. या 5 दिवसांच्या सेलमध्ये ग्राहकांना iPhones वर मोठ्या सवलती दिल्या जात आहे. या व्यतिरिक्त ही सेल इतर ऍपल प्रॉडक्ट्स, जसे - iPads, घड्याळे, हेडफोन आणि इयरफोनवर देखील सुरू आहे. 
 
Apple Days Sale दरम्यान iPhone X 64जीबी अमेझॅनवर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. ग्राहकांना iPhone XR 128जीबी व्हेरिएंटवर 17900 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. यासह HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलत दिली जात आहे. तिथेच, iPhone XR 64जीबी ची सुरुवाती किंमत 58,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यावर देखील अतिरिक्त 10% सूट दिली जात आहे. 
 
त्याचवेळी Amazon वर आयपॅडच्या काही मॉडेल्सवर 3500 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. ऍपल वॉच वर ग्राहक 5500 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. त्याच वेळी ग्राहक इतर ऍपल प्रॉडक्ट्स जसे, एअरपोड्स, लेदर केस इ. सारख्या इतर Apple उत्पादनांवर देखील सवलत मिळवू शकतात. 
 
या व्यतिरिक्त Apple iPhone 6S, 10% सवलतीनंतर 28,999 रुपयांत उपलब्ध होईल. तर  iPhone 7 (32GB) ची किंमत 37,999 रुपये राहील. या व्यतिरिक्त  iPhone 7Plus (32GB) 48,999 रुपयांत मिळेल. Apple iPhone 8 आणि  iPhone 8 Plus च्या 64GB व्हेरिएंटची किंमत क्रमश: 56,999 आणि 65990 रुपये असेल. iPhone XR च्या 128GB आणि 64GB मॉडेल दहा टक्के अतिरिक्त सवलतीसह 63,999 आणि 58,999 रुपयांत उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त अलीकडे लाँच iPhone Xs (64GB) 94,900 रुपयांत आणि iPhone XS Max (64GB) 1,04,900 रुपयांत मिळेल.