शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (13:24 IST)

Airtel नंतर Vodafone-Idea (Vi) नेही झटका दिला,VI रिचार्ज प्लॅन 500 रुपयांनी महागले

Airtel नंतर आता Vodafone-Idea (Vi) ने देखील आपले प्रीपेड प्लान महाग केले आहेत. Vodafone प्रीपेड प्लॅनच्या वाढलेल्या किमती 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. कंपनीने आपले प्रीपेड प्लॅन 500 रुपयांपर्यंत महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलप्रमाणेच व्होडाफोन देखील प्रति युजर्स  सरासरी महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. दरवाढीनंतर Vodafone च्या बेस प्लानची किंमत Airtel प्रमाणेच 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढली आहे. 

कंपनीने 79 रुपयांचा बेस प्लान महाग केला आहे. आता त्याची किंमत रु.99 वर पोहोचली आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये कॉलिंग चार्ज 1 पैसे प्रति २१९ आहे.
 
219 रुपयांचा प्लॅन आता 269 रुपयांचा
हा लोकप्रिय प्लॅन 50 रुपयांनी महाग झाला आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएस आणि दररोज 1GB डेटा मिळेल . 
 
299 रुपयांचा प्लॅन 359 रुपयांचा झाला  
299 रुपयांचा प्लॅन आता 60 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2GB डेटा देते. 28 दिवसांच्या वैधतेसह, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळतो. 
 
449 रुपयांचा प्लॅन 539 रुपयांचा झाला आहे 
 कंपनीच्या या प्लॅनमध्ये 90 रुपयांची वाढ झाली आहे. प्लॅनमध्ये, कंपनी युजर्सला दररोज 2 GB डेटा आणि 100 मोफत एसएमएस देत आहे. प्लॅनचे सब्सक्राइबर्स  देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. 
 
599 रुपयांचा प्लॅन 719 रुपयांचा
हा प्लॅन कंपनीच्या सर्वात लोकप्रिय प्लॅनपैकी एक आहे, ज्याची वैधता 84 दिवस आहे. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देत आहे. 
 
2399 रुपयांचा प्लॅन 2899 रुपयांचा  झाला
कंपनीचा हा प्लॅन 500 रुपयांनी महाग झाला आहे. 365 दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएससह येतो. त्याच वेळी, इंटरनेट वापरण्यासाठी, कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा देत आहे. 
 
डेटा टॉप-अप योजनाही महागल्या
Vodafone-Idea ने टॅरिफ व्हॉईस प्लॅन आणि अनलिमिटेड  प्लॅनसह डेटा टॉप प्लॅन महाग केले आहेत. कंपनीचे डेटा टॉप-अप प्लॅन आता 58 रुपयांपासून सुरू होतील, जे पूर्वी 48 रुपये होते. कंपनीने डेटा टॉप-अप प्लॅनच्या किमती 10 रुपयांवरून 67 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.