शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:10 IST)

व्होडाफोनचा धमाका १६०० रुपयात फोन

रिलायन्स ने सेव टेलिफोन कंपन्यांना धक्का दिला आहे. यामुळे आपला ग्राहक सोडून जाऊ नये म्हणून नवीन नवीन कल्पना करण्यात येत आहेत. यामध्ये आघाडीच्या व्होडाफोन व  आयटेल या दोन टेलिकॉम कंपन्या एकत्र येत 4G स्मार्टफोन बाजारात आणला आहेत. या नवीन फोनचे नाव ‘A20’ आहे. यामध्ये त्याची  किंमत जिओ फोन आणि एअरटेल इंटेक्स अॅक्वा लायन्स N1 या स्मार्टफोनच्या किंमतींएवढीच  आहे.कॅशबॅकची रक्कम  रक्कम मिळत असल्याने हा स्मार्टफोन 1,590 रुपयांना ग्राहकांच्या हाती पडतो आहे. या फोन मध्ये  एक जीबी रॅम आणि 4 इंचाचा WVGA डिस्प्ले या स्मार्टफोनला आहे.आता ऑफर पाहूया : हा फोन विकत जेव्हा घेता तेव्हा ‘A20’ स्मार्टफोनची मूळ किंमत 3,690 रुपये द्याने लागतात. मात्र यावर 2,100 रुपयांचं कॅशबॅक असणार असून रक्कम मोबाईल खरेदी केल्याच्या 18 महिन्यांच्या अंतराने ग्राहकांना परत मिळणार आहे. अर्थात  18 महिन्यांनी 900 रुपये आणि त्यानंतरच्या 18 महिन्यांनी 1200 रुपये मिळणार आहे. म्हणजेच 1,590 रुपयांना हा फोन ग्राहकांना पडतो. सोबत ऑफर प्राईज मध्ये तुम्ही फक्त १५० रुपयांचा रिचार्ज करू शकता त्यात एक जीबी रोज आणि अनलिमिटेड कॉल असणार आहेत.