बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , बुधवार, 20 डिसेंबर 2017 (12:02 IST)

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर स्मृती इराणींना संधी?

गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले असून आता मुख्यंत्रिपदावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला अशा दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे विजय रुपानी यांनाच दुसर्‍यांदा मुख्यंत्रिपदावर संधी दिली जाईल, असा अंदाजही व्य्रत करण्यात येतआहे.
 
गुजरातचा गड राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना यश आले असले तरी मुख्यंत्रिपदावर कोणाला संधी द्यायची असा पेच पक्षनेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.
 
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री आणि वस्त्राद्योगमंत्री स्मृती इराणी यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. नेतृत्वगुण आणि मोदींच्या गोटातील नेत्या असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर इराणींनी हे वृत्त फेटाळले आहे. मी मुख्यंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, मोदी- शहा या जोडीचे धक्कातंत्र पाहता इराणींना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. 
 
केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय हे देखील मुख्यंत्रिपदाचे दावेदार आहेत. मांडवीय हे पाटीदार समाजातून येतात. 
 
गुजरातमधील शेतकर्‍यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांचे नावही चर्चेत आहे.