बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (13:17 IST)

कांदा निर्यातीतून सरकारला दोन महिन्यात ८१२ करोड़ रुपयांचे परकीय चलन

कांदा निर्यातीत भारताची घोड़दोड सुरु असून मागील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ३७१ कोटी रूपयांचे परकीय चलन है मिळले होते.मात्र या वर्षी कांदा निर्यातीत कमालची वाढ झालेली असून तब्बल  दोन महिन्यात ८१२ करोड़  रुपयांचे परकीय चलन हे कांदा निर्यातीतुन मिळालेले आहे.मागील वर्षाच्या तुलनेने ११८ टक्के ने वाढ झालेली आहे.एनएचआरडीएफ आलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल आणि मे २0१६ मध्ये देशातुन ३.०८ लाख टन कांदा निर्यात झालेला होता.यंदा एप्रिल आणि मे २0१७ मध्ये ६.९९ लाख टन कांदा निर्यात झालेला आहे.
 
सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य हटविल्यामुळे कांदा निर्यातीवरील बंधने आपोआपच कमी झाल्याचा आंतराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षा प्रमाणे यंदा ही कांद्याची निर्यात जोरदार सुरु आहे.
 
कांदा निर्यातीवरील बंधने हटविली असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून पुरवठ्यात सातत्य राहिले आहे. त्यामुळे भारतीय कांद्याचे पुन्हा बाजारातील आपले स्थान मिळविले आहे असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. दुबई, सिंगापूर, मलेशिया यासह इतर आखाती व दक्षिण आशियाई देशांतून भारतीय कांद्याला चांगली मागणी होत आहे.कांदा बाजार हे तेजीत असले तरी रंग, चव आदी गुणवत्तेत भारतीय कांदा सरस असल्यानेही जागतिक स्तरावर भारतीय कांद्याला चांगली मागणी होत आहे.
 
भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्‍क्‍यांत कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून त्यातही ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.
 
 
देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३४ लाख ९२ हजार टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झालेला आहे.नाशिक जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झालेली आहे. मागील सात वर्षांनंतर कांद्याचा नवा विक्रमी विक्रम मोडला गेला आहे.
 
निर्यात का वाढली ?
भारतीय कांद्याची गुणवत्ता, त्यामुळे होणारी मागणी, पुरवठ्यातील सातत्य आणि शासनाने "एमईपी' शून्य केल्याने आणि कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदत वाढ दिल्याने कांदा निर्यातीची गाडी सुरळीत झाली आहे त्यातून देशाला चांगले परकीय चलन मिळाले आहे.
 
निर्यात आलेख
 एप्रिल-मे २०१६   ३.०८ लाख टन - ३७१.३६ करोड़ रूपये
 एप्रिल-मे २०१७   ६.९९ लाख टन - ८१२.६४  करोड़ रूपये