मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बंगळुरु , शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (11:33 IST)

विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या CEO-MD पदावरून राजीनामा दिला, शेअर्स गडगले

इन्फोसिसकडून  मिळालेल्या वृत्तानुसार  विशाल सिक्का कंपनीच्या एक्ज़ीक्यूटिव वाइस-चेयरमैनच्या पदावर कायम राहणार आहे, तथा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यूपी प्रवीण राव यांना अंतरिम मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ नियुक्त करण्यात आले आहे. 18 ऑगस्टला झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. 
 
इन्फोसिसकडून पत्राव्दारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली. सिक्का यांची इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदासाठी नव्या चेह-याचा शोध सुरु झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 
 
सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती.  कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती. 
 
विशाल सिक्का म्हणाले
बरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले आहे. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर  अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला आहे.