कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, भाव वाढले
परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मंगळवारच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे .जास्तीत जास्त २६५० ,सरासरी २३०० रुपये तर कमीत कमी ८०० रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
कांदा हा भारतातील बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो कांदा हा प्रत्येक घरात वापरला जातो.त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली की सरकारला घामच फूटतो. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली असून आज उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त २६३१ रुपये भाव जाहिर झाला.
सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून शेतकरी वर्गाचा झालेला खर्च आणि तोटा आत कुठे तरी निघण्यास सुरुवात झाल्याचे शेतकरी बोलत आहे .त्यामुळे कांद्याचे दर पाडण्यासाठी शासनाने आयात करणे, निर्यातबंदी करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे ते मिळू द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल अशी विनंतीही बाजार समितीने केली आहे.