गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 25 डिसेंबर 2017 (10:03 IST)

व्होडाफोनचा नवा प्लॅन, 198 रुपयात दररोज 100 मेसेज, 1GB डेटा

रिलायन्स जिओने ‘हॅप्पी न्यू ईयर 2018 प्लॅन’ची घोषणा केल्यानंतर लगेच व्होडाफोनने हे प्लॅन आणत जोरदार टक्कर दिली आहे. व्होडाफोनच्या नव्या प्लॅनमध्ये पहिला प्लॅन 198 चा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या केवळ प्रीपेड ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

सोबतच 198 शिवाय व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी 229 चा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्येही 198 च्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील, मात्र 1GB डेटाऐवजी दररोज 2GB डेटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना 56GB डेटा मिळणार आहे.

दरम्यान, एअरटेलनेही 199 चा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे.