गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (21:20 IST)

जिओ ने लाँच केले हॅपी न्यू इअर ऑफर, मिळेल जास्त डेटा

टेलिकॉम सेक्टरमध्ये हलचल करणार्‍या रिलायंस जियोने आता नवीन वर्षात 2 नवीन प्रीपेड ऑफर्सच्या माध्यमाने कस्टमर्सला न्यू इयर विश करण्याची तयारी केली आहे. जियोने 199 आणि 299 रुपयांच्या हॅपी न्यू इयर 2018 प्रीपेड ऑफर सादर केले आहे, ज्यात ग्राहकांना आधीपेक्षा जास्त इंटरनेट डेटा मिळेल. 199 रुपयांच्या डेटा प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना 1.2 जीबी हाय स्पीड 4जी डेटा रोज देणार आहे.  
 
या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री वॉइस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस आणि 28 दिवसांसाठी सर्व प्राइम मेंबर्सला जियो ऐप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. अधिक डेटा यूज करणार्‍या लोकांसाठी कंपनीने 299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. याच्या माध्यमाने ग्राहकांना रोज 2जीबी 4जी डेटा, अनलिमिटेड एसएमएस आणि 28 दिवसांसाठी जियो ऐप्ससाठी सबस्क्रिप्शन मिळेल.