शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:46 IST)

5G इंटरनेटमुळे विमानांना काय धोका आहे?

5G
सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेला जाणारी आपली उड्डाणे स्थगित केली. कारण म्हणजे अमेरिकेत 5G इंटरनेट सेवा सुरू करणे. या मुळे विमानाच्या नेव्हिगेशन यंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मोठमोठ्या अमेरिकन एअरलाइन्सनीही 5G ​​सेवेच्या धोक्यांबद्दल आवाज उठवला असून ते म्हणाले की नवीन सी-बँड 5G सेवा अनेक विमानांना उड्डाण करण्यापासून रोखू शकते. 5G इंटरनेट सेवा विमानांच्या उड्डाणांवर कसा परिणाम करू शकते -
 
5G इंटरनेट सेवेसाठी  स्पेक्ट्रम C बँडवर आधारित आहे जो स्पेक्ट्रमच्या 3.7-3.98 गीगाहर्ट्झ (GHz) श्रेणीमध्ये आहे. तर उड्डाण करताना विमानाची उंची मोजण्यासाठी वापरले जाणारे altimeters 4.2-4.4 GHz वर चालतात. एअरलाइन्सप्रमाणे 5G इंटरनेट सेवेसाठी निश्चित केलेले स्पेक्ट्रम बँड हे अल्टिमीटर ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रम बँडच्या आसपास असल्यामुळे अल्टिमीटरच्या अचूक ऑपरेशनमध्ये अडथळा येऊ शकतो.
 
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला यांनी भारतात 5G चाचण्यांवर बंदी घालण्याची विनंती केली असून हे रेडिएशन आजच्या तुलनेत 10 ते 100 पट जास्त असेल असा दावा केला आहे.