1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (07:55 IST)

Facebook SmartWatch: Meta आता गॅझेटमध्ये स्प्लॅश करण्यासाठी सज्ज

meta smartphone
मेटा कंपनी आपल्या 2 नवीन स्मार्टवॉचवर काम करत असून यापैकी एक स्मार्टवॉच येत्या काही महिन्यांत लॉन्च होऊ शकते. यामध्ये यूजर्सना अनेक खास फीचर्स मिळणार असून यांची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया-
 
दमदार कॅमेरा
फेसबुक स्मार्टवॉचमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी प्रायमरी कॅमेरा मिळेल. शिवाय या स्मार्टवॉचच्या मागील बाजूस फोटो क्लिक करण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा असेल. याने वेगवेगळ्या एंगलहून फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करू शकाल. शिवाय तुम्हाला यात 4G सुविधा मिळणार आहे.
 
हेल्थवर लक्ष
या स्मार्टवॉचमध्ये VR आणि AR सारखे फीचर्स असतील. यात आरोग्याशी संबंधित अनेक फिचर्स असतील. यामध्ये तुम्हाला हार्ट रेट ट्रॅकिंग, स्टेप काउंटिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि बॉडी टेंपरेचर सेन्सर सारखे फीचर्स मिळतील.
 
किंमत काय
रिपोर्टनुसार या स्मार्टवॉचचा पहिला व्हेरिएंट या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला व्हाईट, ब्लॅक आणि गोल्डन रंगाचा पर्याय मिळू शकतो. याची किंमत 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकते.