रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (16:47 IST)

तपासून घ्या, बनावट व्हॉट्सअॅप डाऊनलोड केलं तर नाही

व्हॉट्सअॅपचं एक बनावट अॅप दहा लाख युझर्सने डाऊनलोड केलं आहे. गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने आहे. मात्र हे बनावट अॅपही याच नावाने आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली. बनावट अॅप ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या डेव्हलपरने नावही हुबेहूब दिल्यामुळे ग्राहकांची फसवेगिरी झाली.

हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं असावं, असं बोललं जात आहे. रेडिट युझरने एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलेलं आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसत आहे. 

व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो.