1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (12:39 IST)

WhatsApp चं 'Dark mode', यूजर्सला फायदा

WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी 'Dark mode' फीचर रोलआउट केलं आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कंपनीने अँड्रॉइड आणि iOS च्या सर्व युजर्ससाठी ‘डार्क मोड’ फीचर उपलब्ध करवले आहे. 
 
डार्क मोडमुळे चॅटिंग करताना युजर्सच्या डोळ्याला मोबाइल स्क्रीनमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. याशिवाय फोनच्या स्क्रीनमधून येणाऱ्या लाइटचाही कमी वापर होणार असल्याने फोनची बॅटरी अधिक काळ टिकेल.
 
आता WhatsApp मध्ये खास डार्क ग्रे बॅकग्राउंड आणि ऑफ व्हाइट कलर पाहायला मिळेल. यामुळे स्क्रीन ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्टमध्येही सुधारणा झाली आहे. युजर डार्क मोड फीचर आपल्या आवडीप्रमाणे ऑन किंवा ऑफ करु शकतात. डार्क मोडमध्ये ब्लॅक बॅकग्राउंडवर डार्क ग्रे टेक्स्ट दिसतील. 
 
आधी बॅकग्राउंड व्हाइट आणि टेक्स्ट गडद असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात चॅटिंग करताना युजर्सच्या डोळ्यावर त्याचा प्रभाव पडत होता. पण डार्क मोड फीचरमध्ये प्रकाश खूप कमी प्रमाणात वापरला जात असून स्क्रीन पिक्सलचा कमी वापर होईल आणि यामुळे बॅटरीवरही अधिक दबाव पडणार नाही.
 
या प्रकारे करा अ‍ॅक्टिवेट
युजर्स डार्क मोड फीचर सिस्टिम सेटिंग्समध्ये जाऊन ऑन किंवा ऑफ करु शकतात. डार्क मोडसाठी WhatsApp लेटेस्ट व्हर्जनचे असणे गरजेचे आहे.