1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (13:38 IST)

WhatsApp वर जोडण्यात आले हे नवीन फीचर्स, आता डार्क मोडची तयारी

गेल्या काही दिवसांत WhatsApp डार्क मोडची मागणी वेगाने वाढत आहे. कंपनी काही महिन्यांपासून त्याची चाचणीदेखील करीत आहे, परंतु आतापर्यंत ते स्टेबल वर्जनमध्ये आले नाही. या अगोदर बरीच वैशिष्ट्ये आली आहेत, ज्याबद्दल आपणासही माहीत असले पाहिजे.
 
WABetainfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइडसाठी जाहीर केलेल्या नवीनतम बीटा व्हर्जन 2.19.366 मध्ये डार्क मोड दिला आहे आणि यावेळी यात काही सुधारणाही दिसतील.
 
चॅट सेटिंग्जच्या डिस्प्ले पर्यायात डार्क मोड ऑप्टिमायझेशन पाहिले जाऊ शकते. या सर्व पर्यायांची चाचणी घेतली जात आहे. सध्या हा डार्क मोड कधी येईल याविषयी कंपनीने काहीही सांगितले नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोडमध्ये तीन पर्याय पाहिले गेले आहेत. पहिला पर्याय ओरिजनल लाइट थीम, दुसरा डार्क थीम आणि तिसरा बॅटरी सेव्हरचा पर्याय असेल.
 
या तीन पर्यायांपैकी एक म्हणजे कदाचित बॅटरी सेव्हर अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो डार्क मोड सक्रिय असेल. आपण आपला स्मार्टफोन डार्क मोडमध्ये ठेवला आणि बॅटरी सेव्हर सेट ठेवल्यास व्हॉट्सअॅप आपोआपच डार्क मोडमध्ये येईल.
 
WhatsAppने 6 इमोजीसाठी नवीन स्किन्स जारी केले आहेत. या व्यतिरिक्त, नवीनतम अपडेटमध्ये एक वॉलपेपर पर्याय देखील दृश्यमान आहे. जरी ते आधी तेथे होते, परंतु आता नवीन अपडेटसह, याला डिस्प्ले विभागात ठेवले गेले आहे. काही नवीन वॉलपेपर देखील डार्क मोडसह येण्याची अपेक्षा आहे.