1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (15:54 IST)

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा

करोना व्हायरसबाबत अफवा पसरू नये यासाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. व्हॉट्सअॅपने सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा घातली आहे. 
 
पूर्वी प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येईल पण नंतर तोच मेसेज पुन्हा फॉरवर्ड करायचा असल्यास केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करता येईल. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.
 
या व्यतिरिक्त मेसेज फेक आहे वा खरा यासाठी देखील नवीन फीचर रोलआउट केला जाईल. अर्थात WABetaInfo फीचरद्वारे मेसेजच्या समोर एक मॅग्निफाइंग ग्लास आयकॉन दिसेल, ज्यावर टॅप करुन संबंधित मेसेजची तपासणी करता येईल. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कंपनी सातत्याने अॅप अपडेट करत असते.