बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:32 IST)

Whatsapp नव्या अपडेटमध्ये भन्नाट Emoji ते बरचं काही…

Whatsapp आपल्या ग्रहाकांसाठी सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असतं. Whatsapp चॅटींग, इमोजी, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या सुविधांबद्दल नाविण्यपुर्ण बदल केले जातात. आता पुन्हा एकदा whatsapp अपडेट होणार आहे. whatsapp सातत्यानं आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि सतत नवीन काहीतरी सुविधा देत असतं. व्हिडीओ कॉलिंगपासून ते इमोजिपर्यंत अनेक वेगवेगळे बदल whatsapp करणार आहे.
 
Whatsapp ने ग्राहकांसाठी नवीन इमोजि आणल्या आहेत. १३८ नवीन इमोजि ग्रहकांना वापरता येणार आहेत. सध्या यावर काम सुरू असून android 2.20.197.6 बीटा व्हर्जनमध्ये हे इमोजि उपलब्ध आहेत.
 
हटके इमोजी
या इमोजीमध्ये नवीन स्कीन टोन आणि नवीन कपडे आणि वेगळ्या प्रोफेशचा पेहराव आणि हेअरस्टाईलचा वापर या इमोजिला उपलब्ध होणार आहेत. हे इमोजि इतरांपेक्षा नवीन आणि हटके असणार आहेत. शेतकरी, व्यवसायिक, पेंटरची चित्र या इमोजिमध्ये देण्यात येणार आहेत. सध्या या स्टीकर्सवर काम सुरू असून लवकरचे ते whatsapp ग्राहकांना वापरता येणार आहे.