बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (12:12 IST)

Friendship Status in Marathi मैत्री दिवसाच्या शुभेच्छा

ओठावर तुझ्या स्मित हास्य असू दे
जीवनात तुझ्या वाईट दिवस नसू दे
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला 
परंतु, हृद्याच्या एका बाजूस जागा मात्र माझी असू दे......
 
************
 
एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येऊन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..
 
************
 
जीवनात दोनच मित्र कमवा... एक "श्रीकृष्णासारखा" जो
तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि
दुसरा " कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युद्ध करेल.....
 
************
 
मैत्री असावी 
प्रकाशासारखी मनाचा आसमंत उज्ज्वल करणारी, 
मैत्री असावी....
एक मार्ग स्वप्नांना सत्यात उतवणारी, 
मैत्री असावी..... 
विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, 
मैत्री असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार
 
************
 
जिथे बोलण्यासाठी " शब्दांची " गरज नसते....,
आनंद दाखवायला " हास्याची " गरज नसते...,
दुःख दाखवायला " आसवांची " गरज नसते...,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते....
ति म्हणजे " मैत्री "....!!!
 
************
 
रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी
मैत्री गोड असते...
मैत्री म्हणजे त्याग आहे
मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर
मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्या
बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रीला एक रूप आहे
मैत्रीला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वांनी करावी
त्यात खरा आनंद असतो...
 
************
 
फुल सुकते गवत वाळते 
मात्र मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते 
कधी हसायचे असत कधी रुसायचं असत 
मैत्रिरूपी वुक्षाला आयुष्य भर जपायचं असत,..
 
************
 
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेणं,
चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं,
एकमेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास,
माणसं माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
 
************
 
मैत्री कधी संपत नाही
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे
शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..
 
 
काही नाती बनत नसतात....
ति आपोआप गुंफली जातात...
मनाच्या इवल्याश्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात....
त्यालाच तर "मैत्री" म्हणतात...
 
************
 
मैत्रीला नसतात शब्दांची बंधने..,
त्याला असतात ती फक्त हृद्याची स्पंदने..,
मैत्री व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात..,
पण अंतःकरणापासून व्यक्त केले तर चेहर्‍यावरील भावही पुरेसे असतात...!!
 
************
 
चांगले मित्र
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेव्हा हातांना यातना होतात
तेव्हा डोळे रडतात आणि जेव्हा
डोळे रडतात तेव्हा हात अश्रू पुसतात !!
 
************
 
"मैत्री" म्हणजे
'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसऱ्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...
 
************
 
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना
तुमच्या सोबत असेल…
 
************
 
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
 
************
 
आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळू दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…
 
************
 
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
 
************
 
देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमाव..
जीवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
 
************
 
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…
 
************
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…
 
************
 
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…
 
************