मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 जुलै 2020 (10:52 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत मोदी यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देत एक फोटो ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे.सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष जरी असले तरी स्टिअरिंग हे माझ्याच हातात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गाडीची स्टिअरिंग आपल्या हातात असल्याचा इशारा केला आहे.