सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 जुलै 2020 (09:53 IST)

पंतप्रधान मोदी कोरोनासाठी 3 राज्यात करणार अत्यधुनिक लॅबचं अनावरण

रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. अशातच अनलॉक 3 चा टप्पा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सोमवारी दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.
 
मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि नोएडा (Noida) इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सोमवारी उच्च क्षमता असलेल्या कोविड-19 लॅबचं अनावरण करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Health Minister Dr Harshvardhan) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या सुविधांमुळे देशातील चाचणीची क्षमता वाढेल आणि रोगाचा लवकर निदान आणि वेळेवर उपचार करण्यास मदत होईल. अशा प्रकारे या सुविधा कोरोना साथीचा प्रसार नियंत्रित करण्यास मदत नक्की करेस. नोएडा, कोलकाता आणि मुंबईत दररोज 10 हजार पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात सक्षम असणारी लॅब तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
 
भारतात दिवसाला कोरोनाच्या जवळपास 48 हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. मागच्या 4 दिवसांपासून साधारण 48 ते 49 हजार दर दिवशी रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 13,85,522 झाला आहे. तर कोरोनावर यशस्वीपणे मात्र करून 8,85,576 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.