बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (14:53 IST)

व्हाट्सएपच्या या फिचर्समुळे वापरकर्ते त्रासून जातील, म्हणाले सोडून देऊ हा अॅप

कोणते आहे ते वैशिष्ट्य ज्यामुळे 40% लोक व्हाट्सएप सोडण्याविषयी बोलत आहे? या वर्षी व्हाट्सएपने आपल्या अॅपमध्ये अनेक नवीन फिचर सादर केले आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. व्हाट्सएपच्या या वर्षाच्या सर्वाधिक लोकप्रिय वैशिष्ट्याबद्दल बोलले तर वापरकर्त्यांनी याच्या Sticker फिचरला फार पसंत केले आहे. परंतु येणारा नवीन अपडेट वापरकर्त्यांना त्रास देऊ शकतो आणि त्यांना निराश करू शकतो. प्रत्यक्षात, WhatsApp वरील आमचे स्टेटस लवरकच कंपनीच्या कमाईचे माध्यम बनू शकतात.  
 
अहवालानुसार, व्हाट्सएप त्याच्या वापरकर्त्यांच्या स्टेटसमध्ये जाहिराती दर्शवेल. WaBetaInfo ने या अपडेटला घेऊन ट्विट करून प्रश्न विचारला की 'व्हाट्सएप Statusमध्ये लवकरच जाहिराती दिसतील. तर, स्टेटस अॅडस फीचर आल्यानंतर देखील तुम्ही WhatsApp चा वापर कराल का?
 
या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 60% लोक म्हणाले की ते व्हाट्सएप वापरणे चालु राहु देतील. तर 40% लोक म्हणाले की ते व्हाट्सएप वापरणे सोडून देतील. अॅप मध्ये जाहिरातीची सुरूवात पुढील वर्ष म्हणजे 2019 पासून सुरू होईल. जगभरात किमान दीड अरब युजर्स असणार्‍या ह्या अॅपवर सध्या कोणतेही जाहिरात नसतात.  
 
माहितीनुसार, जाहिरात व्हिडिओ स्वरूपात असेल आणि हे इंस्टाग्राम स्टोरीज प्रमाणेच राहील. फेसबुकने या वर्षी जूनमध्ये इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये जाहिरात सुरू केली होती. व्हाट्सएप स्टेटस फिचरमध्ये वापरकर्त्यांना संदेश, फोटो, लहान व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा मिळते, जी 24 तासात स्वत: हटून जातात.