जावा मोटरसायकल लुक्समध्ये बुलेटला मागे सोडत आहे
जावा इंडियाने भारतात आपले तीन मॉडेल जावा स्टॅंडर्ड (Jawa Standard), जावा 42 (Jawa 42) आणि जावा पेराक (Jawa Perak) लॉन्च केले आहे. सुमारे 40 वर्षांनंतर ही बाइक रस्त्यावर धावण्यास तयार आहे. जावा मोटरसायकल ब्लॅक, मारून आणि ग्रे रंगांमध्ये तर जावा 42 सहा कलर वेरिएंटमध्ये येईल. लॉन्च केलेल्या मॉडेलमधील जावा स्टॅंडर्ड आणि जावा 42 मध्ये 293 सीसीचा एक सिंगल सिलेंडर दिला आहे जे 27 एचपी पावर आणि 28 एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल.
तसेच, जावा पेराकमध्ये 334सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. त्याबरोबरच हे इंजिन 6-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशनसह ट्यून केले गेले आहे. बाइकचे इंजिन रेट्रो ठेवण्यासाठी त्यात आधीचाच एक्झॉस्ट सिस्टम दिला आहे. बाइकच्या इंजिनाला खास करून इटलीमध्ये डिझाइन केलेले आहे.
काही दिवसांआधी आलेल्या टीझरमध्ये क्लासिक 300सीसी आणि स्क्रैम्बलर-स्टाइल मोटरसायकलला पाहण्यात आले होते. त्यात दिसणारी जावाची झलक पाहून बरेच लोक आकर्षित झाले. नवीन जावामध्ये जिथे जुन्या एक्झॉस्ट सिस्टमचा आवाज ऐकण्यात आला, तसेच याचे क्लासिक 300 एबीएस आणि फ्रंट डिस्क ब्रेक सारखे फीचर्स सुसज्ज आहे.
नवीन जावा बाइकचे वजन 170 किलोग्रॅम आहे आणि त्याची सीटची उंची 765 मिमी आहे. नवीन बाइकमध्ये 1,369 एमएमचा व्हीलबेस देण्यात आला आहे. जावा स्टॅंडर्ड आणि जावा पेराक बाईक्समध्ये 14-लिटर ड्युअल-टोन क्रोम फिनिश इंधन टाकी दिली आहे. तसेच जावा 42 बद्दल बोलत असताना, मॅट ब्लॅक फिनिशसह अर्बन लुकची जाणीव होते.
नवीन जावाची एक्स-शोरूम किंमत 1,64,000 रुपये आहे, जावा 42 ची एक्स-शोरूम किंमत 1,55,000 रुपये आहे. तसेच, जावा पेराकची किंमत 1.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.