शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

लाँचिंगपूर्वीच लीक झाले वनप्लस 6टी चे फीचर, काय विशेष जाणून घ्या

one plus 6t feature
तरुणांमध्ये वनप्लसच्या नवीन मोबाइल वनप्लस 6टी बद्दल खूप उत्साह आहे. लाँचिंगच्या चार दिवसापूर्वी त्याचे वैशिष्ट्ये लीक झाले. हा फोन 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये केडीजेडब्ल्यू स्टेडियममध्ये लाँच होईल. वनप्लस 6 टीचे वैशिष्ट्य एक सुप्रसिद्ध भारतीय टिपस्टरद्वारे लाँच केले गेले आहे. तपशिलाव्यतिरिक्त, टिपस्टरने युरोपमध्ये फोनचे मूल्य देखील जाहीर केले आहे.
त्यामध्ये काय खास आहे ते जाणून घ्या..
 
* वनप्लस 6 टीमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि अॅडरेनो 630 जीपीयू असेल.
* वनप्लस 6 टी फोन ऑक्सिजन ओएसवर आधारित असेल. हे आपल्या बोटांची गती आणि जेश्चर अतिशय हुशारीने समजून घेतो.
* यात 3.5 मिमी हेडफोन जॅकऐवजी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.
* हे कंपनीचे पहिले असे उपकरण असेल, ज्यात भविष्यकालीन स्क्रीन अनलॉक तंत्रज्ञान वापरले जात आहे.
* वनप्लस 6 टी अधिक सामर्थ्यवान असून यात 3700 एमएएच बॅटरी देखील आहे.
* वनप्लस मधील इतर मोबाइलप्रमाणे त्वरित चार्ज होईल.
* वनप्लस 6 पेक्षा याचे डायमेंशन किंचित मोठे असनू 157.5 x 74.9 x 8.2 मिलिमीटर असतील.