रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत राहिल्याने हात कीटाणूंच्या संपर्कात येतात आणि तोंडात हात घालण्यापूर्वी हात स्वच्छ असले तर शरीरात कीटाणू प्रवेश करू पात नाही. हात धुण्याने अनेक आजारांपासून वाचता येते हे तर आम्हाला माहीतच आहे परंतू हात धुण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?
 
योग्य पद्धतीने हात धुतले नाही तर हात धुणे अथवा न धुणे एकसारखे आहे. हात धुवायला किमान 20 सेकंद तरी द्यावे. हे 20 सेकंद आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. तर जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत
 
हात ओले करा
सर्वात आधी हात ओले करा. पाणी कोमट असल्यास अधिक उत्तम. याने अधिक प्रमाणात कीटाणू दूर होतात आणि हातही नरम राहतात. परंतू पाणी कोमट असावं गरम नाही हे लक्षात असू द्यावं.
 
साबण किंवा लिक्विड हँडवॉश घ्या
आता साबण लावा किंवा लिक्विड हँडवॉश वापरा. लिक्विड हँडवॉश अधिक प्रभावी ठरेल कारण साबणाने अनेक लोकांचे हात लागले असतात.
 
रगडा
आता दोन्ही हात चोळत फेस तयार करा आणि 20 सेकंदापर्यंत चोळा. याने कीटाणू मरतात.
 
स्वच्छ टॉवेल वापरा
हात धुतल्यावर आपण हात स्वत:च्या कपड्याला, रुमालाला किंवा दुपट्याला पुसले तर कीटाणू अश्या कपड्याच्या संपर्कात असलेले कीटाणू पुन्हा हाताला चिकटतात. अशात स्वच्छ टॉवेल वापरा. सुती कपडा सर्वात योग्य ठरेल.
 
प्रवास करताना
प्रवास करताना दरवेळेस हँडवॉश आणि पाणी उपलब्ध होत नाही अशात गरज पडल्यास हॅड सॅनेटाइजर वापरावे ज्याने 99.9 टक्के कीटाणू नष्ट होतात. एक थेंब सॅनेटाइजर हातावर टाकून दोन्ही हात तोपर्यंत चोळावे जोपर्यंत सॅनेटाइजर पूर्णपणे नाहीसे होऊन जाईल.
 
विशेष
शौचालयाच्या दाराच्या हँडलवर मोठ्या प्रमाणात कीटाणू आढळतात. म्हणून हात धुतल्यावर असे हँडल्सला स्पर्श करू नये. याने यावर आढळणारे कीटाणू आपल्या हातावर चिकटतील आणि हात धुणे व्यर्थ जाईल. म्हणून पेपर नॅपकिन वापरून दार खोलणे अधिक योग्य ठरेल.
 
कधी धुवावे हात
 
शौचालयाचा वापर केल्यावर
जखम स्वच्छ केल्यावर
जेवण्यापूर्वी आणि जेवण्यानंतर
बाहेरहून आल्यावर
आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी आणि भेटून आल्यावर
भांडी घासल्यावर
शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर