गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2023 (16:53 IST)

WhatsApp : काय सांगता, व्हॉट्सअॅप खरच तुमची हेरगिरी करत आहे

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जगभरात लोकप्रिय आहे. करोडो लोक त्याचा वापर करतात.सध्या या अॅप वर टीका करण्यात येत आहे. एका ट्विटर अभियंत्याने असा दावा केला आहे की व्हॉट्सअॅप यूजर्स झोपेत असताना त्यांचे ऐकते. ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली असून व्हॉट्सअॅपला घेरले आहे. मात्र, कंपनीने याला अँड्रॉइडचा बग म्हटले आहे.
 
ट्विटर यूजर फोद डबिरीने  त्यांच्या गुगल पिक्सेल फोनवरून मायक्रोफोन वापराचा स्क्रीनशॉट ट्विट केला. या स्क्रिनशॉटवरून असे दिसून येते की, अॅप वापरात नसताना व्हॉट्सअॅप 26 मिनिटांपर्यंत डिव्हाइसद्वारे ऐकत होते. त्याने लिहिले आहे की, मी झोपेत असताना, व्हॉट्सअॅप बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोन वापरत होता.
यानंतर, ट्विटर बॉसने पोस्टला चालना दिली आणि लिहिले की व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. काही लोक याकडे इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरचे षड्यंत्र म्हणूनही पाहत आहेत. कारण, ट्विटरवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि एन्क्रिप्टेड डीएम उपलब्ध असतील अशी माहिती मस्कने नुकतीच दिली आहे. 
 
म्हणजेच हे प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसारखे बनणार आहे. मात्र, याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हे गोपनीयतेचे उल्लंघन असून हे अस्वीकार्य असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले. Edited by - Priya Dixit