बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (11:53 IST)

Whatsapp लवकरच या फोनवर काम करणार नाही

इन्स्टंट मेसेजिंग एप व्हाट्सएपचे जगभरात 1.5 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत आणि आता या लोकांपैकीच काही लोकांच्या फोनवर हा अॅप कार्य करणार नाही. व्हाट्सएपने अशी माहिती दिली आहे की आगामी वर्षात तो अनेक जुन्या व्हर्जनमधून त्याचे सपोर्ट काढून टाकणार आहे. या जुन्या व्हर्जनमध्ये Android, iOS आणि Windows सामील आहे. ही माहिती बुधवारी आपल्या ब्लॉगमध्ये कंपनीने शेअर केली.
 
* 2010 मध्ये विंडोज फोन ओएस लॉचं झाला होता - विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम सन 2010 मध्ये ऑक्टोबरमध्ये लॉचं झाला होता पण त्याला  अँड्रॉइड आणि आयओएस सारखे यश मिळाले नाही. या वर्षी जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की आता ते तो डिसेंबरापासून विंडोज ओएसला सपोर्ट देणार नाही आणि लोकांना सल्ला देण्यात आली की त्यांनी iOS किंवा Android फोन विकत घ्यावे. जगातील सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी सुमारे 20 टक्के लोक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) असणारा फोन वापरात आहे.  
 
* Android आणि iOS 7 वरून देखील संपेल सपोर्ट - विंडोज त्याशिवाय व्हाट्सएप अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 (जिंजरब्रेड) किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर फेब्रुवारी 2020 पासून सपोर्ट करणे बंद करणार आहे. ही तारीख iOS 7 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर देखील लागू होईल.