शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जून 2019 (16:04 IST)

Xiaomi ने लॉन्च केलं Mi Power Bank 2i वर्ल्ड कप स्पेशल अॅडिशन, किंमत फक्त 999 रुपये

Xiaomi ने World Cup 2019 special Edition अंतर्गत नवीन पॉवर बँक लॉन्च केली आहे. या Power Bank ची किंमत फक्त 999 रुपये आहे. Xiaomi ने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चियर करण्यासाठी ते ब्लु ऑप्शनमध्ये देखील लॉन्च केले आहे. 
 
वर्ल्ड कपाकडे बघताना Xiaomi ने हा स्पेशल ऍडिशन लॉन्च केला आहे. त्याचा रेड कलर ऑप्शन ऑक्टोबर 2018 मध्ये लॉन्च केला गेला होता. या कलर व्हेरिएंटची किंमत 899 रुपये आहे. 10,000mAh Mi Power Bank 2i ला स्लीक एनोडाइज्ड ऍल्यूमिनियम अलॉय बॉडीसह लॉन्च करण्यात आलं आहे. Mi Power Bank 2i चा नवीन World Cup ऍडिशन स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा बरेच वेगळे नाही. यात आपल्याला ड्युअल USB आउटपुट मिळतो, ज्याच्या मदतीने आपण एकाच वेळी दोन डिव्हाइसेस चार्ज करू शकता. 
 
Mi Power Bank 2i टू वे फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हे डिव्हाईस 14.2 मिमी पातळ आहे आणि ते 240 ग्रॅम वजनाचे आहे. या पॉवरबँकचा कन्व्हर्जन रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. आपल्याला यात लो पॉवर मोड देखील मिळतो. या मोडला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला पॉवर बटण डबल दाबावा लागेल.