गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (11:21 IST)

Smart Glasses खास फीचर्ससह बाजारात होणार उपलब्ध

Xioami कंपनीचा लवकरच स्मार्ट चष्मा बाजारात येणार आहे. या नव्या स्मार्ट ग्लासमध्ये अधिक फीचर्स असतील. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी स्मार्ट ग्लासवर काम करत आहे आणि कंपनीने याच्या पेटेंटसाठी अप्लाय केलं आहे. 
 
कंपनी लवकरच स्मार्ट ग्लासेस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. शाओमीच्या या नव्या स्मार्ट ग्लासमध्ये, रेग्युलर स्मार्ट ग्लासहून अधिक फीचर्स असतील, असं शाओमीकडून फाईल करण्यात आलेल्या पेटेंटमध्ये हायलाईट करण्यात आलं आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi स्मार्ट ग्लास 4F डिटेक्शन आणि एक नव्या थेरेप्यूटिक सिग्नल एमिटरसह येईल. शाओमीच्या या स्मार्ट ग्लासचा थेरेप्यूटिक सिग्नल एमिटर फोटोथेरेपी करू शकेल. या स्मार्ट चष्माच्या फोटोथेरेपीमुळे मेंदूशी निगडित आजार आणि डिप्रेशनसारख्या मेंटल समस्यावर उपचारासाठी मदत मिळू शकेल. 
 
रिपोर्टप्रमाणे, लाइट सिग्नल अल्ट्रावॉयलेट, इंफ्रारेड, लेजर आणि व्हिजिबल लाइटसह हा स्मार्ट चष्मा असू शकतो. या ग्लासेसमध्ये साउंड सिग्नलसह व्हिज्युवल सिग्नल पाठवण्याचीही क्षमता असेल. कंपनीचे स्मार्ट ग्लासेस कधी लाँच होणार, याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.