1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (11:19 IST)

Janmashtami 2023 : श्रीहरी रे श्रीहरी,यावं यावं तू या युगे

Janmashtami 2023
श्रीहरी रे श्रीहरी,यावं यावं तू या युगे,
वाजवुनी मधुर पावा, करा सर्वास जागे,
निद्रिस्त जाहले समस्त, अंधःकार रे झाला,
काय चांगले काय वाईट, विसर मानवास पडला,
स्वैराचार माजला चहूकडे, मदमस्त माणुस झाला,
गीतेस विसरुनी सारे, अस्ताकडे ते चालले,
विटंबना नारी ची करून, धन्य धन्य पावले,
आण अंकुश या नराधमांवर, सुरदर्शन सोडावे,
शिरच्छेद करुनी या लोकांना वाटे शासन तू करावे!
आहे काळरात्र जाहली, तू रे किरण तेजाचा,
वाट दाऊनी लोकांस, दे अर्थ त्यांसी जगण्याचा.
..अश्विनी थत्ते.