शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (14:53 IST)

Janmashtami 2022 कृष्ण जन्माष्टमी कधी आहे, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संयोग

krishna
Krishna Janmashtami 2022: श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा गुरुवार 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे. शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल.
 
कृष्ण जन्माष्टमी कधी आहे : इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे यंदा श्री कृष्ण जन्माष्टमी सण 18 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांग भेद असल्यामुळे काही लोक 19 ऑगस्ट रोजी देखील सण साजरा करतील.
 
जन्माष्टमी शुभ मुहूर्त : 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:05 ते 12:56 पर्यंत अभिजीत मुहूर्त राहील. ध्रुव योग रात्री 08:41 ते 19 ऑगस्ट रोजी रात्री 08:59 पर्यंत असेल. 
 
कृष्ण जन्माष्टमी 2022 19 ऑगस्ट शुभ मुहूर्त :
- अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:36 ते 12:27 पर्यंत
- विजय मुहूर्त : दुपारी 02:11 ते 03:03 पर्यंत
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:17 ते 06:41 पर्यंत
- सायाह्न संध्या मुहूर्त : संध्याकाळी 06:30 ते 07:36 पर्यंत
- निशिता मुहूर्त : रात्री 11:40 ते 12:24 पर्यंत
- अमृत काल मुहूर्त : रात्री 11:16 ते 01:01 पर्यंत
- या दिवशी बुधादित्य योग राहील.
 
जन्माष्टमी पूजा विधी
सकाळी लवकर उठून स्नान करुन देवघराची सफाई करावी.
देवघरात दिवा लावावा.
सर्व देवांची पूजा करावी.
या दिवशी गोपाळ कृष्णाची बाळ स्वरुपात पूजा करावी.
कृष्णाला जलाभिषेक करावे.
या दिवशी गोपाळ कृष्णाला पाळण्यात झोका द्यावा.
कृष्णाच्या आवडीचे पदार्थ करुन नैवेद्य दाखवावा. 
तुळशीची पाने घालून पंचामृत अर्पण करावे.
लड्डू गोपाळची सेवा पुत्राप्रमाणे करावी.
कृष्णाला वैजयंतीची फुले अर्पण करावे.
अष्टमीला रात्री पूजनाचे महत्तव आहे कारण त्यांचा जन्म मध्यरात्री झाला होता.
रात्री श्री कृष्णाची विशेष पूजा- अर्चना करावी.
त्यांना खडीसाखर, मेवे इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
गोपाळ कृष्णाची आरती करावी.
या दिवशी त्यांची विशेष सेवा करावी.
नंतर विसर्जनासाठी अक्षदा हातात घेऊन मूर्तीवर अर्पण करत म्हणावे हे भगवान श्रीकृष्ण आम्हा सर्वांवर तुझा कृपा आशिर्वाद राहू दे.