सावळ्या ऐकव नरे तुझा पावा
सावळ्या ऐकव नरे तुझा पावा,
मन माझे करी कृष्ण कृष्ण धावा,
एकेरी मारते तुझं हाक सख्या रे,
कारण त्यास ही तूच, मन बावरे,
खेळू खेळ यमुने तीरी,ये मुकुंदा,
बोलाविले कित्तीदा, ये तरी एकदा,
राधे परी मी नसले तरी काय झाले
प्रेमात माझ्या काय बरे उणें राहिले?
प्रत्येक गौळण अशीच आहे वेडी,
एकदा तरी आता काढ ना रे खोडी,
सुनं झाले गोकुळ तुझ्या विना कसं,
गेलास इथून एकदा,घेऊ कसा मी श्वास,
अतरंगी साठवते रूप तुझं श्रीहरी,
आठवण तुझी करून देईल मज ही बासरी!!
....अश्विनी थत्ते