श्री कृष्ण जन्माष्टमीपूर्वी या शुभ वस्तू घरी आणा! लाडू गोपाळाचा आशीर्वाद मिळवा
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे आनंद, भक्ती आणि उत्साहाचा सोहळा. या दिवशी बाळगोपाळाची पूजा करून त्यांच्या आगमनाची विशेष तयारी केली जाते. वास्तूशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या आधी किंवा या दिवशी काही विशेष आणि पवित्र वस्तू घरात आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, समृद्धी येते आणि बाळकृष्णाची कृपादृष्टी कायम राहते. तुम्हीही या जन्माष्टमीला श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खालील शुभ वस्तू घरात आवर्जून आणू शकता:
बासरी: बासरी ही श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. वास्तूशास्त्रानुसार घरात लाकडी किंवा चांदीची बासरी ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील कलह संपतात आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते.
मोरपंख: श्रीकृष्णाच्या मुकुटाची शोभा वाढवणारा मोरपंख घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. घराच्या मुख्य दारावर किंवा देव्हाऱ्यात मोरपंख ठेवल्याने वास्तूचूक आणि वाईट दृष्टी दूर राहते. तसेच यामुळे धन-धान्यात वाढ होते.
बाळकृष्णाची नवीन मूर्ती (लड्डू गोपाल): जर तुमच्या घरात अजून लड्डू गोपाळाची मूर्ती नसेल, तर या जन्माष्टमीला अष्टधातूची किंवा पितळेची बाळकृष्णाची सुंदर मूर्ती नक्की आणा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन आनंदी वातावरण तयार होते.
वैजयंती माला: वैजयंतीच्या फुलांची किंवा मण्यांची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. जन्माष्टमीला ही माळ घरात आणून लड्डू गोपाळाला परिधान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो.
कामधेनू गायीची मूर्ती: श्रीकृष्ण आणि गाईंचे नाते अतुट आहे. बाळकृष्णासोबत वासराला पाजणाऱ्या गायीची (कामधेनू) लहान मूर्ती घरात आणल्याने संतती सुख मिळते आणि घरातील धन-समृद्धी वाढते.
जन्माष्टमीच्या दिवशी या सर्व गोष्टी देव्हाऱ्यात ठेवून त्यांची रीतसर पूजा करा आणि बाळकृष्णाला तुळशीचे पान अर्पण करायला विसरू नका, कारण तुळशीशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते
लोणी आणि खडीसाखर: श्रीकृष्णाला लोणी-साखर अत्यंत प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी ताज्या लोण्याचा नैवेद्य दाखवून ते घरात ठेवल्याने आरोग्य आणि आनंद टिकून राहतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! "जय श्री कृष्णा!"
