1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. जन्माष्टमी

श्रीकृष्णाचा विडा

WD
विडाघ्या हो नारायणा। कृष्णा जगत्रजीवना।
विनविते रखुमाबाई। दासी होईन मी कान्हा। विडा.।। धृ.।।

शांती हे नागवेली। पान घेऊनियां करीं।
मीपण जाळुनियां। चुना लावियेला वरी ।।विडा.।।1।।

वासना फोडुनियां। पूर्ण केली सुपारी।
भावार्थ कापुरानें। घोळियेली निर्धारीं।। विडा.।।2।।

विवेक-कातरंग। रंगीं रंगला सुरंग।
वैराग्य जायफळ। मेळविलें अभंग।।विडा.।।3।।

दया हे जायपत्री। क्षमा-लवंगा आणिल्या।
सुबुद्धि-वेलदोडे। शिवरामें अर्पियेले।।4।।
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा